Bhosari: तीन भावंडांना मारहाण आणि तरुणीच्या विनयभंग प्रकरणी चौघांवर गुन्हा

Bhosari: Four accused in assault of three siblings and molestation of a young girl

एमपीसी न्यूज- तीन भावंडांना लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच जखमी तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फुगेवाडी येथील संजयनगर येथे घडली.

शैलेश एकनाथ हाके (वय 30), रुपेश उर्फ जिवा एकनाथ हाके (वय 27), एकनाथ हाके (वय 60, तिघे रा. संजय नगर, फुगेवाडी), निलेश एकनाथ हाके (वय 36, रा. दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी 18 वर्षीय जखमी तरुणाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी (दि.3) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी तरुणाचे त्यांच्या भावाशी मागील दोन दिवसांपूर्वी घरगुती किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून दोघा भावांमध्ये बुधवारी रात्री वाद सुरु होता.

त्यावेळी आरोपी आपसात संगनमत करून तिथे आले. आरोपी शैलेश याने फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारले. आरोपी रुपेश आणि एकनाथ या दोघांनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात दोन्ही भावंडांना डोक्याला गंभीर दुखापत झाली.

ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी यांची बहीण आली असता आरोपी एकनाथ याने तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.

एकनाथ याने फिर्यादी यांच्या बहिणीला लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. आरोपी निलेश याने हाताने मारहाण करत शिवीगाळ करून फिर्यादी व त्यांच्या भावंडांना जीवे मारण्याची धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.