Bhosari : दापोडीतील खूनप्रकरणी चौघे गजाआड

एमपीसी न्यूज – दापोडी येथे रविवारी पहाटे कोयत्याने वार करून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी भोसरी पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

अभिषेक राजू चव्हाण (वय 26), रुपेश दिलीप संकपाळ (वय 20), राहुल वीर उर्फ पप्प्या (वय 20), सनी गजभीव (वय 20, सर्व रा. जयभीमनगर, दापोडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अल्विन रवी राजगोपाल (वय 19, रा. कैलास जाधव चाळ, जयभीमनगर, दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. क्‍लेरा रॉबर्ट किट्टो यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निखील (पूर्ण नाव माहित नाही, वय 21) हा आरोपी अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ३०) पहाटे दोन वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून, पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून अल्विन रवी राजगोपाल यांच्यावर कोयत्याने डोक्‍यात सपासप वार केले. तसेच पेव्हिंग ब्लॉक आणि दगडाने मारहाण करून त्याचा खून केला. ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या क्‍लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल यांनाही मारहाण करून जखमी केले. भोसरी पोलिसांनी याप्रकरणातील चार जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील एक आरोपी अजूनही फरार आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.