Bhosari: पोलीसात तक्रार दिल्याच्या रागातून चौघांची महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज – पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून चौघांनी महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना 29 एप्रिल रोजी कासारवाडी येथे घडली. याप्रकरणी चार जणांना भोसरी पोलिसांनी गजाआड केले आहे.

शहेनाज महमंद शरीफ गवंडी (वय 45), जैनाबी चाँदसाहब गवंडी (वय 65) इस्माईल चाँद मुल्ला (वय 40) आणि समिना इस्माईल मुल्ला (वय 35, सर्व रा. हिराबाई झोपडपट्टी, कासारवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुमित्रा श्रवणकुमार कलाल (वय 33) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सुमित्रा यांनी आरोपी शहेनाज यांचा मुलगा टिल्लू गवंडी याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याबाबत शहेनाज हिने सुमित्रा यांना जाब विचारत घरासमोर पडलेला पत्र्याचा डब्बा सुमित्रा यांच्या डोक्यात मारला. जैनाबी यांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच इतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. सहायक

पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.