Bhosari : पूर्ववैमनस्यातून चार जणांना मारहाण; आठ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरी जात असताना चुकून एका घराच्या दरवाजास धक्का लागला. या तत्कालिक कारणावरून तसेच पूर्ववैमनस्यातून आठ जणांनी मिळून चौघांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 21) दुपारी दीडच्या सुमारास दापोडी येथे घडली.

अर्शान शाकीर शेख (वय 23), हबीबा शाकीर शेख (वय 52), नौसिन अर्शान शेख (वय 20), हिना वसीम शेख (वय 26), वसीम हुसेन शेख (वय )30, फैजल शाकीर शेख (वय 24), शाकीर रमजान शेख (वय 56), जमीला हुसेन शेख (वय 53, सर्व रा. दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फरहत आतिक शेख (वय 35, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे रेशन  घेऊन घरी येत असताना त्यांचा धक्का चुकून आरोपीच्या फ्लॅटच्या दरवाजास लागला. त्या कारणावरून तसेच पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादी शेख आणि त्यांच्या भावाला हाताने लाथाबुक्क्यांनी मारून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या बहिणीला शिवीगाळ करत मारहाण केली.

फिर्यादी यांच्या आई भांडणे सोडवण्यासाठी आल्या असता त्यांना देखील आरोपींनी ढकलून देत शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजास लाथा मारल्या. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.