Bhosari : घरफोडी करून चार लाखांचे दागिने पळवले;अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 4 लाख 6 हजार रुपयांचे 203 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 16) सकाळी पावणेसातच्या सुमारास शास्त्रीनगर, कासारवाडी येथे उघडकीस आली.

केशव दत्तात्रय नवले (वय 38, रा. नवले निवास, सरिता गार्डनसमोर, शास्त्रीनगर, कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केशव यांचे सरिता गार्डन समोर एक मजली घर आहे. वरच्या मजल्यावर केशव आणि त्यांची पत्नी राहतात. तर तळमजल्यावर त्यांचे आई आणि वडील राहतात.

मागील 15 दिवसांपूर्वी केशव यांचे आई-वडील गावी गेले होते. त्यामुळे तळमजल्यावरील घर कुलूप लावून बंद होते. शुक्रवारी रात्री साडेदहा ते शनिवारी सकाळी पावणेसातच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले 203 ग्रॅम वजनाचे 4 लाख 6 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.