Bhosari : चाकण, भोसरी, देहूरोड, तळेगाव परीसरातून चार मोबाईल पळवले!;संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – चाकण, भोसरी आणि देहूरोड परीसरातून तीन मोबाईल फोन जबरदस्तीने पळवले. तर तळेगाव येथे चोरट्यांनी हॅंडपर्स चोरली. त्यामध्ये एक मोबाईल फोन होता. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रेम विष्णू उईके (वय 19, रा. चाकण. मूळ रा. सेवाग्राम, जि. वर्धा) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फिलीप्सकुमार जायनारायण सरोज (वय 18), मनजीत सुखलाल सरोज (वय 19, दोघे रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. 17) रात्री पावणेअकराच्या सुमारास फिर्यादी प्रेम ऐश्वर्या आंबेठाण चौकातून झित्राईमळा येथे त्यांच्या रूमवर पायी चालत जात होते. रूमवर जात असताना ते फोनवर बोलत होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी त्यांचा 15 हजार रुपयांचा मोबाईल फोन हिसकावून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

सचिन भास्कर ढोरजे (वय 40, रा. च-होली) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सचिन रविवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास मयुरी पॅलेस भोसरी येथे रोडवर बसची वाट पाहत उभारले होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी दोन चोरट्यांनी सचिन यांच्या हातातील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

अमोल धनाजी नाझारकर (वय 33, रा. तळवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. अमोल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि. 18) सकाळी सव्वासहाच्या सुमारास अमोल राणे कंपनीसमोरील बस स्टॉपवर उभे राहून कामावर जाण्यासाठी कंपनीच्या बसची वाट पाहत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातून जबरदस्तीने पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

पूजा अरविंद मुजुमदार (वय 34, रा. तळेगाव स्टेशन) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास पूजा शिवाजी चौक तळेगाव स्टेशन येथील लेडीज शॉप वेअर दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. दुकानात काउंटरवर त्यांनी त्यांची हॅन्डपर्स ठेवली. अज्ञात चोरट्याने पर्स चोरून नेली. पर्समध्ये मोबाईल फोन, एटीएम कार्ड आणि अन्य वस्तू असा एकूण 16 हजार रुपये किमतीचा ऐवज होता. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.