Bhosari : दोन मुलांचा जन्मताच मृत्यू झाल्याने विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – जन्मताच दोन मुलांचा मृत्यू झाला. यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याप्रकरणी 35 वर्षीय पीडित विवाहितने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासू करवंदा शिंदे (वय 67), जाऊ सुनीता सुधीर शिंदे (वय 30), दीर सुधीर शिंदे (वय 37, रा. वैदुवारी, हडपसर), नणंद उर्मिला राजेंद्र गवळी (रा. लोहगाव, कलवड वस्ती, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 डिसेंबर 2001 ते 19 नोव्हेंबर 2019 या कालावधीत हा प्रकार घडला. ‘लग्नात संसारोपयोगी वस्तू का आणल्या त्याबदल्यात दोन लाख रुपये रोख रक्कम घेऊन ये, नाहीतर घरात राहू नकोस’, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली.

दरम्यान, फिर्यादीची दोन मुले जन्मताच मरण पावली. या कारणावरून देखील फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच फिर्यादी यांचे वापरते व अंगावरचे कपडे काढून घेतल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.