Bhosari : चार वर्षीय चिमुकलीचा विनयभंग; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – एका चार वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री गवळीमाथा, भोसरी येथे घडली.

अखिलेशकुमार देवानंद सिंग (वय 27, रा. गवळीमाथा, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 16) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराजवळून जात असताना त्यास फिर्यादी यांची चार वर्षीय मुलगी एकटी खेळताना दिली. यामुळे आरोपी अखिलेशकुमार याने तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.