_MPC_DIR_MPU_III

Bhosari: बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यावसायिकाची 38 लाखांची फसवणूक

Fraud of Rs 38 lakh on the basis of forged documents

एमपीसी न्यूज – बनावट कागदपत्रे दाखवून तसेच स्वतःची ओळख लपवून चार जणांनी आणि त्यांच्या अनोळखी साथीदारांनी मिळून एका व्यावसायिकाकडून 64 टन 880 किलो स्टील घेतले. स्टील घेतल्यानंतर व्यावसायिकाला पैसे न देता व्यावसायिकाची 38 लाख 15 हजार 211 रुपयांची फसवणूक केली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

परशुराम साहेबराव भोसुरे (वय 50, रा. आळंदी रोड, भोसरी) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय विश्वकर्मा, सागर पारेख, हरीश राजपूत, दीपक गुजराल व त्यांच्या टोळीतील अन्य साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःची ओळख लपवून खोट्या कंपनीचे नाव सांगून तसेच खोटी कागदपत्रे दाखवून फिर्यादी यांच्याकडून 38 लाख 15 हजार 211 रुपये किमतीचे 64 टन 880 किलो वाजताचे स्टील एच आर शीट विकत घेतले. स्टील घेतल्यानंतर त्या मालाचे पैसे न देता भोसुरे यांची आरोपींनी आर्थिक फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.