Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली येथे ‘मोफत’ महाआरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभेचे (Bhosari) आमदार पै.महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमीत्त निलेशदादा नेवाळे सोशल फाऊंडेशनच्या वतीने ‘मोफत’ भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर आज शनिवारी (दि.26) आणि रविवारी (दि.27) आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर गुंजकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, स्पाइन रोड चिखली येथे सकाळी दहा ते साडेपाच या वेळेत सर्व नागरिकांसाठी खुले असणार आहे. लालफीत कापून या महाशिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक कार्तिक लांडगे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विष्णूपंत नेवाळे, डॉ. गुंजकर, मंडळाध्यक्ष महेश कवितके, दिनेश यादव, अजय सायकर, संतोष ठाकूर, अंकुश मळेकर, सचिन सानप, कविता हिंगे, घरकुल फाऊंडेशन अध्यक्ष सुधाकर धुरी, अजय जाधव, आनंदा यादव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना निलेश नेवाळे यांनी (Bhosari) कोरोना काळाची आठवण करून देताना आजच्या धकाधकीच्या काळात आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच, कोरोना काळात आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनी केलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.

तसेच, आमदार महेश लांडगे यांच्या कामाचे कौतुक करताना कार्तिक लांडगे म्हणाले की, चिखली आणि मोशी हा प्रभाग हळूहळू विकसीत होत आहे. या संदर्भात महेश दादांनी केलेले प्रोजेक्ट आणि येणारे प्रोजेक्ट यांची त्यांनी यावेळी माहिती दिली. चिखली भागात न्यायालय, इंजिनीअरींग कॉलेज, सायन्स पार्क हे विकसित होत आहे. महेश दादा यांच्या पाठपुराव्यामुळे भामा-आसखेड व आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाण्याचे नियोजन केले. हे काम भाजपच्या कार्यकाळात झाले. तसेच निलेश नेवाळे यांच्या नेतृत्वाखाली चिखली परिसरातील समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. लोकांचा वाढता प्रतिसाद त्यांची लोकप्रियता त्यांच्या कामातून दिसत आहे, असेही मत कार्तिक लांडगे यांनी व्यक्त केले.

Constitution Day of India: न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे “भारतीय संविधान दिन” उत्साहात साजरा

नागरिकांना या शिबिरात हिमोग्लोबीन, रक्तदाब, मधुमेह, हाडांची घनता, सीबीसी, ईसीजी, बीएमआय, लिक्वीड प्रोफाईल, किडनी प्रोफाईल यांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी होणार आहे.

याबरोबरच शिबिरात मुतखडा, कॅन्सर, हर्निया, मुळव्याध, किडनीचे आजार मणक्याचे आजार, शरीरावर असणाऱ्या खुणा, जखमा यांच्याही तपासण्या उपलब्ध असणार आहेत. शिबिरात भाग घेणाऱ्यांना पुढील तीन महिन्यांच्या डॉक्टरांच्या सल्ला व शस्त्रक्रियांसाठी विशेष सवलत देखील दिली जाणार आहे. त्यामुळे सकाळपासूनच या शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.