Bhosari : किरकोळ कारणावरून टोळक्याकडून तरुणाला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मुलांच्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळून एकाला लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना भोसरी मधुबन कॉलनी येथे घडली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश हरिश्चंद्र सावंत (वय 28, रा.मधुबन कॉलनी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सांगत भैरू सावंत (वय 32), नितीन भैरून सावंत (वय 27), नाथ शिंदे (वय 25), कन्या शिंदे (वय 26) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांच्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी आपापसात संगनमत करून रविवारी (दि.17) दुपारी फिर्यादी याना यांना अडवले. त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्या लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले असून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.