BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला टोळक्याकडून मारहाण

167
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याने तरुणाला मारहाण केली. त्यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शास्त्रीनगर कासारवाडी येथे बुधवारी (दि. 13) दुपारी एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

वीरू शरणप्पा शिरसाठ (वय 27, रा. साई नगर चाळ, कासारवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सर्फराज उर्फ रावण शेख (वय 21), सोहेल शेख (वय 20), शहबाज शेख, सोहेल पटेल, इस्माईल पटेल, अरबाज शेख, इरु उर्फ इ-या (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. कासारवाडी), अमीर शेख (रा. फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी), शहबाज शहा (रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शहबाज शेख, इस्माईल पटेल, अमीर शेख या तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इस्माईल आणि फिर्यादी वीरू यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने त्याच्या आठ साथीदारांना घेऊन वीरू यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी अरबाज याने वीरू यांच्या तोंडावर फरशी मारली. यामध्ये वीरू गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गाडे तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3