Bhosari: रस्त्यावरील ट्रॅकमधून 42 गॅस सिलेंडर चोरीला

एमपीसी न्यूज – रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी भारत गॅस कंपनीचे 1 लाखांचे तब्बल 42 गॅस सिलेंडर चोरून नेले. ही घटना कासारवाडी येथे नुकतीच घडली.

युवराज रामभाऊ पिंपळे (वय-30, रा. पिंपळे सदन, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची कासारवाडी येथे भारत गॅस कंपनीची गॅस एजन्सी आहे. ग्राहकांना सिलेंडर वितरित करून उर्वरित सिलेंडर (एमएच-16, बी. 3438) या ट्रकमध्ये ठेवून ट्रक शंकरवाडी रोड येथे पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी ट्रकमधील 92 हजार 589 रूपयांचे 42 घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर चोरून नेले. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.