Bhosari : गॅस गळतीच्या स्फोटात तिघेजण जखमी

एमपीसी न्यूज – सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने गॅस सुरू करताना मोठा स्फोट झाला. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज, बुधवारी (दि. 4) सकाळी सातच्या सुमारास भोसरी येथे घडली.

मनीषा साळुंखे (वय 35), माऊली साळुंखे (वय 40), सिद्धार्थ साळुंखे (वय 13, सर्व रा. सिद्धेश्वर शाळेजवळ, भोसरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर शाळेजवळ साळुंखे कुटुंब एका इमारतीमध्ये छोट्या खोलीत राहतात. रात्री मनीषा यांच्याकडून गॅस सिलेंडर सुरू राहिला. त्यामुळे गॅस गळती झाली. बुधवारी पहाटे उठल्यानंतर मनीषा यांनी गॅस सुरू करण्यासाठी लाईटरचा वापर केला. लाइटरने गॅस पेटवत असताना अचानक भडका होऊन स्फोट झाला. यामध्ये मनीषा साळुंखे आणि त्यांचे पती माऊली साळुंखे हे गंभीररीत्या भाजले व त्यांचा मुलगा सिद्धार्थ साळुंखे हा देखील जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच भोसरी अग्निशमन उपकेंद्राचे सब ऑफिसर नामदेव शिंगाडे, विकास नाईक, विठ्ठल भुसे, कुंडलिक भुतापल्ले, सुरज गवळी, शांताराम घारे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.