Pimpri News: भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघीत सर्वाधिक 1807 सक्रिय रुग्ण

Pimpri News: Bhosari, Gavalinagar, Charholi, Dighi has the highest number of 1807 active corona patients शहरातील 5146 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 496 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. पालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 1807, त्याखालोखाल ‘फ’ प्रभागाच्या हद्दीत 1456 सक्रिय रुग्ण आहेत. हे प्रभाग कोरोना हॉटस्पॉट झाले आहेत. तर, सर्वांत कमी म्हणजेच 592 रुग्ण ‘ह’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत.

महापालिकेने सोमवारी (दि.10) रात्री दिलेल्या नकाशानुसारची ही आकडेवारी आहे. शहरातील 8942 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 29 हजार 836 वर पोहोचली आहे.

शहरात 10 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून शहरातील 29 हजार 836 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 21 हजार 208 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 5146 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 496 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शहरातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती सक्रिय रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालयनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. सोमवारी रात्री प्रसिध्द केलेल्या नकाशानुसार भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी परिसर येत असलेल्या ‘इ’ प्रभागाच्या हद्दीत सर्वाधिक 1807 तर त्याखालोखाल चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 ‘फ’ कार्यालयाच्या हद्दीत 1456 सक्रिय रुग्ण आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या

‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात 1078 सक्रिय रुग्ण आहेत. प्रभागातील रुग्णसंख्या दोन हजाराच्या पुढे गेली होती. आता नियंत्रणात येत आहे.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात 1409 सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे 619 रुग्ण आहेत.

‘ड’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे सर्वांत कमी म्हणजेच 759 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे सर्वाधिक 1807 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 1456 रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 1222 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे सर्वांत कमी म्हणजेच 592 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांवर कोविड केअर सेंटर, महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.