Bhosari : जनसेवा सहकारी बँकेच्या वतीने गिरीश प्रभुणे आणि आसाराम कसबे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळावर गिरीष प्रभुणे आणि आसाराम कसबे यांची नुकतीच निवड झाली. त्या निवडीबद्दल जनसेवा सहकारी बँक एमआयडीसी शाखेच्या वतीने दोघांचा सत्कार करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरीचे अध्यक्ष मुरलीधर साठे, पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुनील कडुसकर, ॲड. राजीव पुणेकर, राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी ॲड. सुनील पडवळ आणि प्रा. दिगंबर ढोकळे यांनी मनोगत व्यक्त केले. पिंपरी चिंचवड मध्ये साहित्य चळवळ सुरु करणारे गिरीश प्रभुणे आणि लोककलेचे अभ्यासक आसाराम कसबे यांच्या नियुक्तीमळे पिंपरी चिंचवडमध्ये अधिक जोमाने काम करता येईल. अनेक उभरत्या, नवोदित साहित्यिकांना बळ मिळेल, असे सदाफुले म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे म्हणाले कि , साहित्य आणि संस्कृती संवर्धनासाठी अगोदरपासून सुरु असलेले कार्य अधिक जोमाने करता येईल. आसाराम कसबे हे सर्वसामान्य कार्यकर्ते असूनही आपल्या कर्तृत्वाने या पदावर आले आहे. त्यांच्या सोबतीने आणखी चांगली कामगिरी होईल.

या सत्काराचे आयोजन जनसेवा सहकारी बँकचे माजी अध्यक्ष ॲड. सतीश गोरडे, शाखाप्रमुख विलास लांडगे, पेशवे यांनी केले. सूत्रसंचालन विलास लांडगे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.