Bhosari: पालिकेच्या भोसरी रुग्णालयाला दत्ताकाका साने यांचे नाव द्या  – नाना काटे

Give name of Dattakaka sane to Municipalty Bhosari Hospital -Nana Kate : दत्ताकाका जनतेच्या कामासाठी नेहमी अग्रेसर असत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक दत्ताकाका साने हे सक्रिय नगरसेवक होते.  चिखली परीसरच नव्हे तर संपूर्ण शहराच्या विकासाबाबत ते नेहमी जागरुक असत. विशेषत: भोसरी विधानसभा संघाकडे त्याचे विशेष लक्ष होते. त्यामुळे भोसरी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयास दत्ताकाका यांचे नाव द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, दत्ताकाका जनतेच्या कामासाठी नेहमी अग्रेसर असत. लॉकडाउनच्या काळात त्यांनी हजारो नागरीकांना मदत केली.

_MPC_DIR_MPU_II

मदत करत असतानाच त्यांना कोरोना झाला. त्यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. चिखली परीसरच नव्हे तर संपूर्ण शहराच्या विकासाबाबत नेहमी जागरुक असत. विशेषत: भोसरी विधानसभा संघाकडे त्यांचे लक्ष होते.

त्यांच्या कार्यांची कायमस्वरुपी ओळख राहण्यासाठी पालिकेच्या भोसरी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयास दत्ताकाका साने यांचे नाव दिल्यास  हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विरोधी पक्षनेते काटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.