BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : पूरग्रस्तांना द्या, ‘मदतीचा हात अन् माणुसकीची साथ’; आधार सोशल फौंडेशनचे आवाहन

एमपीसी न्यूज – सातारा, सांगली आणि कोल्हापूर अक्षरशः पाण्याखाली गेलंय. तिथल्या पूरग्रस्त बांधवांचे संसार उध्वस्त झालेत. कित्येकांचे बळी गेलेत. दावणीला बांधलेली जनावरे हंबरडे फोडून मृत्यमुखी पडलीयत. या पूरग्रस्त बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तूंची साहित्यरूपी मदत करावी.

सर्वांच्या मदतीने एकत्र केलेल्या जीवनावश्यक वस्तू आधार सोशल फाउंडेशनचे सदस्य स्वतः पूरग्रस्त बांधवांपर्यंत पोहचवणार आहेत. तरी सर्वांनी सढळ हाताने साहित्यरूपी मदत करावी.

  • यात चांगले कपडे (फाटके, बटन नसलेले नकोत), लहान मुलांचे कपडे (उबदार असल्यास उत्तम), महिलांना मुलींना लागणारे कपडे, सॅनिटरी नॅपकिन, ब्लँकेट, धान्य (गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळ, साखर, तेल, साबण) या स्वरुपात ही मदत अनुकुल चौक, गवळीमाथा, टेल्को रोड भोसरी येथे पाठवावी.

अधिक माहितीसाठी विकास भुंबे 9766585756, भरत इघे 9881643252, अण्णा साबळे 9096031313, निलेश शिंदे 9763923843, संजय गवळी 9822981031, तुषार ढोकले 8208404942 या क्रमांकावर साधावा, असे आवाहन आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भूंबे यांनी शहरातील नागरिकांना केले आहे.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3