BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : भोसरीत राजमाता जिजाऊंना अभिवादन  

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे राजमाता जिजाऊंना भोसरी येथे अभिवादन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुनील कडुसकर, उपाध्यक्ष ऍड. योगेश थंबा, सचिव ऍड. गोरख कुंभार, सहसचिव ऍड. अंकुश एम. गोयल, खजिनदार संतोष मोरे, ऑडीटर ऍड. महेश टेमगिरे, सदस्य ऍड. पुनम राउत, ऍड. निलेश ठोकळ, ऍड. निलेश ठोकळ, ऍड. विकास बाबर, ऍड. केशव घोगरे व बार चे ऍड. मोनिका सचवाणी, ऍड. फ्रान्सीस भोसले, ऍड. अनिल सेजवानी हे व बार चे माजी अध्यक्ष ऍड. सुहास पडवळ, ऍड. सतीश गोरडे, ऍड. विलास कुटे, ऍड. सुनील कड व ऍड. सुदाम साने, ऍड. पद् मावती पाटील, ऍड. दीपा कदम, ऍड. गणेश राउत, ऍड. दिलीप शिंगोटे, ऍड. बाळासाहेब रणपिसे, ऍड. प्रसन्ना लोखंडे, ऍड. बी. के. कांबळे, ऍड. सुजाता बिडकर, ऍड. कांता गोरडे, ऍड. लाळगे पाटील, ऍड. हरीश भोसुरे, ऍड. नाना काळभोर, ऍड. पुनम शर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी सहसचिव ऍड. अंकुश एम. गोयल बोलतांना म्हणाले की राजमाता जिजाऊ या एक आदर्श गुरू आणि माता आहेत. त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची संकल्पना सांगितली व हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली. जागतिक युवा दिन व स्वामी विवेकानंद यांची जयंती या सर्वांचे औचित्य साधून तरूणांनी आपले बहुमुल्य आयुष्य निर्व्यसनी ठेवले पाहिजे . छत्रपती शिवाजी महाराजांचा व स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून काम केले पाहिजे.यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आले व जागतिक युवा दिन साजरा करण्यात आला.
HB_POST_END_FTR-A4

.