Bhosari : भोसरीत 34 हजारांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Gutkha worth Rs 34,000 seized in Bhosari Food and Drug Administration action

एमपीसी न्यूज – भोसरी परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत 34 हजार 335 रुपयांचा गुटखा जपत केला. यामध्ये एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 25) सकाळी दहा वाजताच्या सुमारास महात्मा फुले झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे करण्यात आली.

रूपाराम भगाजी चौधरी (वय 48, रा. महात्मा फुले झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अरुण श्रीराम धुळे (वय 56, रा. कोथरूड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महराष्ट्र शासनाने गुटखा, तंबाखू आणि तंबाखूजन्य प्रदार्थ उत्पादन, वाहतूक, साठवणूक आणि विक्री करण्यासाठी बंदी घातली आहे.

तरीही आरोपी त्याच्या महालक्षमी प्रोविजन स्टोअर्स या दुकानात गुटखा विक्री करीत होता. याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली असता त्यांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

दुकानातून 198 पॅकेट सुगंधित पान मसाला, 213 पॅकेट जाफरानी जर्दा, एक हजार 170 पॅकेट सुगंधित तंबाखू, असा एकूण 34 हजार 335 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

आरोपी रूपाराम याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अन्न व सुरक्षा मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.