Bhosari : लांडेवाडीत तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – भांडण झाल्यानंतर दोन तासांनी मागून येऊन तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 12) सायंकाळी साडेसातच्या सुमारास लांडेवाडी येथे घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली.

महादेव बाजीराव खाडे (वय 30, रा. लांडेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अशोक रामभाऊ गव्हाणे (वय 30, रा. विठ्ठलनगर लांडेवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलिसात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास अशोक आणि महादेव यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणानंतर अशोक लांडेवाडी येथे भोसरी-पिंपरी रस्त्यावरून पायी चालत जात होता. त्यावेळी महादेव याने मागून येऊन अशोकवर लोखंडी कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये अशोकला डोक्यावर आणि हातावर गंभीर इजा झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक हंडाळ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.