Bhosari : हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – हुंडा आणला नाही (Bhosari) तसेच घरगुती कारणांवरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार 20 मे ते 29 ऑक्टोबर या कालावधीत हडपसर आणि दिघी येथे घडला.

अक्षय विश्वनाथ जामले (वय 27), विश्वनाथ परवती जामले (वय 55), महिला (वय 48, रा. हडपसर. मूळ रा. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon : ‘दुर्गा झाली गौरी’ने गाजविला सृजन नृत्य महोत्सवाचा चौथा दिवस……

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी (Bhosari) माहेरहून हुंडा आणला नाही. तसेच त्या काम करत नाहीत. सकाळी उठण्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. त्यांना वेळोवेळी शिवीगाळ करून हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.