BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : उसने पैसे मागत तिघांकडून व्यक्तीला मारहाण; शिक्षिकेसह तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तीन लाख रुपये उसने मागत तिघांनी मिळून एका व्यक्तीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच जबरदस्तीने वाहनात बसवून घरी नेऊन तिथेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना 4 जून रोजी जय गणेश साम्राज्य आणि राजगुरूनगर येथे घडली. याप्रकरणी एका शिक्षिकेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

संतोष भानुदास बोरकर (वय 42), सुवर्णा संतोष बोरकर (वय 37, दोघे रा. जय गणेश साम्राज्य, इंद्रायणीनगर, भोसरी) आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लक्ष्मण जिजाबा वाडेकर (वय 45, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण यांनी आरोपींच्या मुलाबरोबर अश्लील वर्तन केले. तसेच पॉलिसीच्या पैशांच्या कारणावरून आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर सुवर्णा यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली.

यानंतर आरोपींनी लक्ष्मण यांना जबरदस्तीने वाहनात बसवून त्यांना तीन लाख रुपये उसने मागितले. त्यासाठी लक्ष्मण यांनी नकार दिला असता आरोपींनी लक्ष्मण यांना त्यांच्या राजगुरूनगर येथील घरी नेऊन मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

.