Bhosari : मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून केरळ पूरग्रस्तांना 15 हजार रुपयांची मदत

एमपीसी न्यूज- आपल्या चिमुकल्या मुलीचा वाढदिवस साजरा न करता केरळपूरग्रस्तांना 15 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य युवक सेल कृषी पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व कुंभारगावचे ग्रामपंचायत सदस्य व आमदार महेश लांडगे यांचे स्वीय सहायक अनिकेत गायकवाड यांनी आपली मुलगी भक्तीचा वाढदिवस साजरा न करता केरळ पूरग्रस्तांना मदत करुन माणूसकीचे दर्शन घडविले आहे.

अनिकेत गायकवाड यांची मुलगी भक्तीचा आज तिसरा वाढदिवस आहे. गायकवाड हे दरवर्षी मुलीच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, आर्थिक मदत असे उपक्रमत घेतात. यंदा भक्तीचा तिसरा वाढदिवस आहे. केरळातील पूरग्रस्त परस्थितीमुळे त्यांनी भक्तीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवासाचा खर्च टाळून त्यांनी केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदत केली आहे. गायकवाड यांनी 15 हजार रुपये केरळ वेलफेअर असोसिएशनकडे सुपूर्त केले आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत बोलताना अनिकेत गायकवाड म्हणाले, अतिवृष्टीमुळे केरळ उधवस्त झाले आहे. अतिवॄष्टीमुळे झालेले नुकसान भरुन येण्यास काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून फुल नाही पण फुलाची पाखळी म्हणून मुलीचा वाढदिवसाचा खर्च टाळून 15 हजार रुपये केरळपूरग्रस्तांना दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.