Bhosari : सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात ‘परिवर्तन’ आणणारी ‘हेल्पलाईन’; स्थानिक नागरिक भाऊसाहेब रासकर यांची प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज – आरोग्य, शिक्षण, नोकरी, सार्वजनिक सेवा आणि व्यक्तिगत अडचणी अशा अनेक अडचणी दैनंदिन जीवनात सर्वसामान्य नागरिकांना येतात. त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाकडे पाठबळ असतेच असे नाही. त्यामुळे बहुतांश नागरिकांना आधाराची आणि मार्गदर्शनाची गरज असते. हा आधार आणि मार्गदर्शक म्हणून आमदार महेश लांडगे यांनी सुरु केलेली ‘परिवर्तन हेल्पलाईन’ मागील चार वर्षांपासून काम करत आहे, अशी प्रतिक्रिया च-होली येथील स्थानिक नागरिक भाऊसाहेब रासकर यांनी व्यक्त केली.

भाऊसाहेब रासकर म्हणाले, “मागील तीन वर्षांत हजारो तक्रारी निकालात काढल्यामुळे ‘परिवर्तन’ला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. ‘9379909090’ या संपर्क क्रमांकावर नागरिकांना आपली तक्रार नोंदवता येते. ही सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवरही उपलब्ध केली आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविणे, महिला व युवकांचे संघटन, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करुन देणे, विविध अभिनव योजना राबविणे आदी कामे कार्यालयामार्फत केली जातात. नोकरीविषयक ‘एचआर’ विभाग कार्यरत आहे. विशेष म्हणजे, भोसरी मतदार संघातील प्रत्येक प्रभागनिहाय एक आमदार कार्यालय स्वयंसेवकाची नियुक्ती केली आहे. त्याद्वारे त्या-त्या विभागातील तक्रारी-समस्यांचे निराकरण केले जात आहे.

“नागरी समस्यांबाबत नागरिकांच्या मनामध्ये लोकप्रतिनिधींबाबत सहसा उदासीनतेची भावना असते. मात्र, भोसरी परिसरातील नागरिकांना आपल्या समस्या तात्काळ सोडविता याव्यात, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी २०१५ पासून ‘परिवर्तन हेल्पलाइन’ सुरु केली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आपल्या समस्या सोडविण्यास मदत होत आहे. तसेच या परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून थेट संबंधितांपर्यंत पोहोचता येत आहे. यामुळे प्रशासकीय अधिका-यांनाही काम करण्यास सोयीस्कर होत आहे.

“परिवर्तन हेल्पलाईन मंत्रालयसंबंधी कामकाज, महापालिकासंबंधी कामकाज, नोकरीविषयक सल्ला विभाग, सामाजिक संस्था संघटना समन्वय, नगरसेवक समन्वय समिती, आरोग्य विषयक विभाग, शैक्षणिक योजना विभाग, नागरी समस्या निराकरण, महिला समस्या निराकरण विभाग आदि विभागांमध्ये काम करत आहे.

आजवर तब्बल 50 हजाराहून अधिक नागरिकांच्या समस्या या ‘परिवर्तन हेल्पलाईन’च्या माध्यमातून सोडविण्यात आल्या आहेत. यामुळे प्रशासकीय कामात सुसूत्रता आली असून महापालिकेसह अन्य शासकीय विभागातील अधिकारी कर्माचा-यांना देखील परिवर्तन हेल्पलाईनचा फायदा झाला असल्याचेही रासकर यांनी सांगितले.

व्हिडीओ : –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.