Bhosari : रिक्षा विकत घेतली म्हणून तरुणाला मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज – तरुणाने रिक्षा विकत घेतली. विकत घेतलेली रिक्षा त्याने नेली. यावरून रिक्षा विकत घेणा-या तरुणाला चौघांनी ‘रिक्षा का विकत घेतली’ असे म्हणत मारहाण केली. ही घटना मोशी टोलनाका येथे शनिवारी (दि. 18) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

बाजीराव रामराव सरांडे (वय 21, रा. बागडे वस्ती, ता. खेड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आलिशान अनिस शेख (वय 22, रा. तळवडे) आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव यांनी आलिशान यांच्याकडून रिक्षा विकत घेतली. व्यवहार झाल्यानंतर बाजीराव यांनी रिक्षा त्यांच्यासोबत नेली. यावरून आलिशान आणि त्याच्या तीन साथीदारांनी बाजीराव आणि त्यांच्या भावाला बोलावून त्यांना ‘रिक्षा का घेऊन गेलास’ असे म्हणत शिवीगाळ केली.

तसेच लोखंडी रॉडने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आलिशान याला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.