Bhosari : पीएमपीएमएलच्या प्रामाणिक चालक आणि वाहकाने प्रवाशाचे पैशांचे पाकीट केले परत

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान प्रवाशाचे बसमध्ये राहिलेले पैशांचे पाकीट प्रामाणिक चालक आणि वाहकाने प्रवाशाला सुपूर्द केले. पीएमपीएमएलच्या भोसरी नियंत्रण कक्षातून संबंधित प्रवाशाला पैशांचे पाकीट खातरजमा करून देण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

चालक अमोल सखाराम गावडे आणि वाहक केशव रंगनाथ खराटे शनिवारी (दि. 4) सकाळी आठ वाजता भोसरी ते राजगुरूनगर (एम एच 12 / के क्यू 0201) या बसमध्ये प्रवासी घेऊन जात होते. प्रवासादरम्यान अविनाश पांडे (रा. वराळी फाटा, चाकण) या प्रवाशाचे पाकीट बसमध्ये पडले. राजगुरूनगर येथे गेल्यानंतर वाहक खराटे यांना ते पैशांचे पाकीट मिळाले. वाहक केशव आणि चालक अमोल यांनी ते पाकीट भोसरी स्थानक येथील वाहतूक नियंत्रक सुरेश कवडे, मनोहर जोंधळेकर, काळुराम लांडगे यांच्याकडे सुपूर्द केले.

पाकिटामध्ये तीन हजार 500 रुपये आणि महत्वाची कागदपत्रे होती. प्रवासी पांडे पाकिटाबाबत चौकशी करण्यासाठी भोसरी नियंत्रण कक्षात आले. वाहतूक नियंत्रकांनी ओळख पटवून पांडे यांचे पैशांचे पाकीट त्यांना सुपूर्द केले. पैसे आणि कागदपत्रे सुखरूपपणे मिळाल्यामुळे पांडे यांनी बस चालक, वाहक आणि वाहतूक नियंत्रकांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.