Bhosari : पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे प्रवाशाला परत मिळाली मौल्यवान वस्तूंची बॅग

एमपीसी न्यूज- पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या उद्दाम वर्तणुकीच्या अनेक बातम्या वाचायला मिळतात. परंतु त्यांच्यातील प्रामाणिकपणाचा प्रत्यय आलेली घटना नुकतीच घडली. प्रवाशांकडून विसरून गेलेली मौल्यवान वस्तू असलेली बॅग बसच्या वाहक-चालकाच्या व वाहतूक नियंत्रकाच्या प्रामाणिकपणामुळे संबंधित प्रवाशाला परत मिळाली. वाहतूक नियंत्रकाकडे सुपूर्द केली.

आज, मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता ध्यान सिंग नावाच्या प्रवाशाची पुणेस्टेशन येथे मौल्यवान वस्तुची मोठी बॅग वाहक प्रकाश इंगळे व चालक श्री मुटके याना आढळून आली. त्या बॅगेमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि काही मौल्यवान गोष्टी होत्या. वाहक चालक या दोघांनी भोसरी बीआरटी बसस्थानकामधील वाहतूक नियंत्रक काळुराम लांडगे व विजय आसादे यांच्याकडे सुपूर्द केली.

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल ध्यानसिंग यांनी त्यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.