Bhosari : जेवण तिखट बनवल्याने हॉटेलचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज- जेवण तिखट बनववल्याच्या रागातून चौघांनी हॉटेलचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शाहूनगर येथील हॉटेल जगुभाईमध्ये घडली. या प्रकरणी गुरुवारी (दि. 18) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमनाथराव पोपटराव शेलार (वय 37, रा.मोरवाडी) असे मारहाण झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. या प्रकरणी चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेलार यांचे जुन्या आरटीओ रस्त्याला शाहूनगर येथे जगुभाई नावाने हॉटेल आहे. रविवारी (दि. 14) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास चौघे आरोपी त्यांच्या हॉटेलमध्ये आले. दरम्यान जेवण तिखट असल्याचे सांगत शेलार यांच्यासोबत वाद घालू लागले. वाद वाढल्याने चौघांनी शेलार व त्यांचा पुतण्या अनिकेत याला जबर मारहाण केली. त्यानंतर फोर्स कंपनीच्या मिनीबसमध्ये बसून पळ काढला. पोलीस उपनिरीक्षक एस.ती.शेंडगे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.