Bhosari : उंबराचे झाड तोडण्याच्या कारणावरून पती-पत्नीस मारहाण

एमपीसी न्यूज – घरासमोर असलेल्या उंबराच्या झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून पाच जणांनी मिळून पती-पत्नीस मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी फुगेवाडी येथे घडली.

लता अनिल कांबळे (वय 33, रा. फुगेवाडी, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार लक्ष्मण भीमराव कांबळे (वय 52), चंद्रकला लक्ष्मण कांबळे (वय 45), विजया कमलेश पटेल (वय 33), अंजली उर्फ कांचन लक्ष्मण कांबळे (वय 30), सुहास लक्ष्मण कांबळे (वय 28 सर्व रा. फुगेवाडी, दापोडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे यांच्या घरासमोर असलेल्या उंबराच्या झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांच्याशी भांडण केले. आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

तसेच आरोपींनी प्रशासनाने दिलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.