Bhosari : रक्षाबंधनानंतर वेळेत घरी न आल्यामुळे पतीकडून पत्नीवर चाकूने वार

एमपीसी न्यूज – रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी माहेरी गेलेली महिला कार्यक्रमानंतर लवकर घरी आली नाही. या कारणावरून चिडलेल्या पतीने पत्नीवर चाकूने वार केले. तसेच शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 20) रात्री साडेआठच्या सुमारास संभाजीनगर येथे घडली.

ज्योती संतोष सावळे (वय 29, रा. संभाजीनगर) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती संतोष तुकाराम सावळे (वय 42) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्योती रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी माहेरी गेल्या. माहेरून सासरी येण्यास त्यांना उशीर झाला. या कारणावरून आरोपी संतोष याने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच चाकूने हातावर वार केले. यामध्ये ज्योती जखमी झाल्या. याबाबत त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.