Bhosari: भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना ‘कपबशी’ चिन्ह

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे विलास लांडे यांना ‘कपबशी’ चिन्ह मिळाले आहे. निवडणूक विभागाने अपक्ष निवडणूक लढविणा-या उमेदवारांना आज (सोमवारी) चिन्हांचे वाटप केले. भाजपचे महेश लांडगे यांचे ‘कमळ’ आणि बहुजन मुक्ती पार्टीचे विजय आराख यांचे ‘हत्ती’ चिन्ह आहे.

प्रचार खर्‍या अर्थाने निवडणुकीतील चिन्हांमुळे रंगात येतो. राजकीय पक्षाच्या उमेदवारांची चिन्हे आधीच निश्चित असतात. पण, अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चिन्हाचे वाटप होते. त्यामुळे त्यांना कमीत कमी कालावधीत आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे कठीण काम यशस्वीपणे करावे लागते. त्यामुळे रोजच्या वापरातील आणखी ओळखीच्या चिन्हांला अपक्ष उमेदवारांची मागणी असते. त्यामुळे यंदा निवडणूक आयोगाने लोकप्रिय गोष्टींचा चिन्ह म्हणून समावेश केला आहे.

भोसरीतून दुस-यावेळी अपक्ष निवडणूक लढणारे विलास लांडे यांना पुन्हा ‘कपबशी’ चिन्ह मिळाले आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत देखील लांडे यांचे ‘कपबशी’ चिन्ह होते. लांडे यांना कपबशी साथ देईल का? याबाबत भोसरीत चर्चा सुरु झाली आहे.

जनहित लोकशाही पार्टीचे विश्वास गजरमल यांना ‘ऑटो रिक्षा’, समाजवादी पार्टीच्या वहिदा शेख यांना ‘सायकल‘, बहुजन मुक्ती पार्टीचे विजय आराख यांना ‘खाट‘, वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख यांना ‘गॅस सिलेंडर‘, छाया जगदाळे यांना ‘शिट्टी‘, हरेश डोळस यांना ‘चावी‘, भाऊ अडागळे यांना ‘शिवणयंत्र‘, मारुती पवार ‘कपाट‘ आणि ज्ञानेश्वर बो-हाटे यांना ‘तुतारी‘ वाजविणारा माणूस चिन्ह मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.