Bhosari : इंद्रायणी थडीत रंगणार सौंदर्यस्पर्धा अन नृत्याचा थरार

आमदार महेश किसनराव लांडगे यांची संकल्पना ; विविध स्पर्धांचे आयोजन, प्रवेश मोफत

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अंतर्मुख करायला लावणारा ‘इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव भरविण्यात येत आहे. हा महोत्सव भोसरी मधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी गावजत्रा मैदानावर 8 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. यामध्ये रंगत आणण्यासाठी सौंदर्यस्पर्धा आणि नृत्यस्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

शिवांजली सखी मंच यांच्या वतीने इंद्रायणी थडी डान्स स्पर्धा 2019चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या कलाकारांची प्राथमिक फेरी (ऑडिशन) शनिवारी (दि. 2) आणि रविवारी (दि. 3) रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आमदार महेश लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशेजारील शितलबाग हॉलमध्ये होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश मोफत आहे.

दोन प्रकारात या स्पर्धा होणार आहेत. समूह नृत्य प्रकारात प्रथम (11 हजार रुपये), द्वितीय (7 हजार रुपये) आणि तृतीय (5 हजार रुपये) अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर एकल नृत्यासाठी (सोलो डान्स) प्रथम (7 हजार), द्वितीय (5 हजार) आणि तृतीय (3 हजार) अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी कलाकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी शिवकुमार मुळे (9096113383), विजय धारीवाल (9130116363) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  • प्रथमच ‘मिसेस इंद्रायणी’ या फॅशन शोचे आयोजन
    इंद्रायणी थडी जत्रेनिमित्त जेट इंडिया एव्हिएशन यांच्या वतीने शहरात प्रथमच ‘मिसेस इंद्रायणी’ या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे ऑडिशन सोमवार (दि. 4) आणि मंगळवार (दि. 5) रोजी सकाळी नऊ वाजता अंकुशराव लांडगे नाट्यगृहात होईल. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 50 हजार एक रुपये, द्वितीय पारितोषिक 25 हजार एक रुपये आणि तृतीय पारितोषिक 15 हजार एक रुपये देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी 9503455614 / 9503455386 यांच्याशी संपर्क करावा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.