BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : पवनाथडीच्या धर्तीवर आता भोसरीकर भरविणार इंद्रायणीथडी !

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पिंपरी महापालिकेतर्फे भरविण्यात येणारी यंदाची पवनाथडी जत्रा भोसरीत भरविण्यात येणार होती. परंतु, ऐनवेळी ठरावामध्ये बदल करत सांगवीत जत्रा घेण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर भोसरीकर आता पवनाथडीच्या धर्तीवर लवकरच  इंद्रायणीथडी जत्रा भरविणार आहेत. याबाबतचे फलक सोशलमिडीयावर ‘व्हायरल’ झाले असून जत्रेवरुन सत्ताधा-यांमध्ये कुरबुरी सुरु झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पुण्यातील भीमथडी जत्रेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुमारे बारा वर्षांपूर्वी पासून पवनाथडी जत्रा भरविण्यास सुरुवात केली. महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महापालिकेतर्फे महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. पंरतु, पवनाथडी जत्रा भरविण्याच्या ठिकाणीवरुन तत्कालीन सत्ताधा-यांमध्ये नेहमीच मतभेद होत होते. विद्यमान सत्ताधा-यांमध्ये देखील जत्रेच्या ठिकाणावरुन मतभेत झाले होते.

यंदाची पवनाथडी जत्रा भोसरीत भरविण्यात येणार होती. परंतु, ऐनवेळी ठरावामध्ये बदल करत सांगवीत जत्रा घेण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर भोसरीकर आता पवनाथडीच्या धर्तीवर लवकरच इंद्रायणीथडी जत्रा भरविणार आहेत. याबाबतचे फलक सोशलमिडीवर व्हायरल झाले आहेत.

महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पुजाताई महेशदादा लांडगे यांच्यावतीने जत्रेचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. ”सन्मान स्त्री शक्तीच्या जिद्दीचा, गौरव नारीशक्तीच्या कर्तृत्वाचा”, ‘खेळ महोत्सव खास महिलांसाठी” अशा मजकुराचे फलक झळकले आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.