HB_TOPHP_A_

Bhosari : इंद्रायणी थडीतील खाद्यजत्रेत मांसाहारी व शाकाहारी पदार्थांवर खवय्यांनी मारला मनसोक्त ताव

0 874

एमपीसी न्यूज- खमंग मासवडी, लज्जतदार चिकन, मटन आणि चमचमीत माशांच्या डिशेसवर इंद्रायणी थडीतील खवय्यांनी मनसोक्त ताव मारला. त्याचबरोबर थंडीची पर्वा न करता कुल्फी, आइस्क्रीम, बर्फाच्या गोळ्याचा देखील आस्वाद घेतला.

HB_POST_INPOST_R_A

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करुन देणारा इंद्रायणी थडी हा ग्रामीण महोत्सव मागील तीन दिवसांपासून भोसरी येथे मोठ्या उत्साहात सुरु आहे. त्यात आपल्या महाराष्ट्राच्या वेगळ्या खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देणारे अनेक स्टॉल्स आहेत. महाराष्ट्राच्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश या प्रमुख भागांची स्वतची अशी वेगळी खाद्यसंस्कृती आहे. कोकण म्हटले की आठवतात ते रुचकर माशांचे पदार्थ, पश्चिम महाराष्ट्राची मासवडी, खानदेशातील पुरणपोळीचा मांडा, कोल्हापूरचा चमचमीत तांबडा, पांढरा रस्सा आणि खमंग मटन व चिकन, विदर्भातील सावजी मसाल्याचे पदार्थ. इंद्रायणी थडीतील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समध्ये या सर्व खमंग व रुचकर पदार्थांची नुसती रेलचेल आहे. त्याच्याच जोडीला पिठलं भाकरी, रस्सा भाकरी असे शाकाहारी पदार्थ देखील येथे आहेत. तसेच कुल्फी, आईस्क्रीम, बर्फाचा गोळा देखील येथे आहे. यातील कोकणी माशांच्या खाद्यपदार्थांच्या, मासवडीच्या स्टॉलवर विशेष गर्दी आहे. त्याचबरोबरीने चिकन, मटणाला देखील खवय्यांची पसंतीची पावती मिळत आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: