Bhosari: इंदूबाई विठोबा लांडे यांचे वृद्धापकाळाने निधन

एमपीसी न्यूज – भोसरी येथील सांप्रदायिक परिवारातील इंदूबाई विठोबा लांडे (वय 93) यांचे आज (बुधवारी) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांच्या त्या मातोश्री होत.

भोसरी येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. आज (बुधवार) सकाळी 11 वाजता भोसरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्काराला नागरिकांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन लांडे यांनी केले आहे.

इंदूबाई लांडे यांच्या पश्चात पती माजी नगरसेवक विठोबा लांडे, माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे, तीन मुली, सून माजी महापौर मोहिनी लांडे, नातू विद्यमान नगरसेवक विक्रांत लांडे तसेच सुना व नातवंडे असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.