Bhosari: राष्ट्रवादीकडून अन्याय, उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपद देऊन बीडकरांचा मान वाढविला -जयदत्त क्षीरसागर

एमपीसी न्यूज – बीड जिल्ह्यातील सर्व जनता माझे कुटुंब आहे. मी सार्वजनिक जीवनात लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा वापर केला. राष्ट्रवादी पक्षाने माझ्यावर अन्याय केला असला. तरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला कॅबिनेट मंत्री करून बीडकरांचा मान वाढविला, असे उद्गार राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भोसरी येथे काढले.

पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या बीड विधानसभा मतदार संघातील नागरिकांचा आज (शुक्रवारी) भोसरीत संवाद मेळावा पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे उपस्थित होते. बीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षिरसागर, अॅड. कांकरिया, दिलीप गोरे, सुधीर जोशी उपस्थित होते.

यावेळी गोविंद घोळवे म्हणाले, जयदत्त क्षीरसागर आणि लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे वेगवेगळ्या ठिकाणी असले. तरी, त्यांच्यात वैचारिक मतभेद होते मात्र, मनभेद नव्हते. जयदत्तअण्णा सर्व समाजाला घेऊन जाणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा विजय हा विक्रमी असणार आहे. कारण, वंचीत उपेक्षित लोकांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शिवसेनेला त्यांच्यासारखा नेता मिळाल्याने सर्वांना आनंद झाला आहे. पक्षाला त्यांचा फायदा होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्याला असणा-या बीड विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे. तसेच गावातील नातेवाईकांना देखील अण्णांच्या पाठिशी उभा रहाण्याचे सांगावे, असे आवाहनही घोळवे यांनी उपस्थित बीडकरांना केले.

यावेळी उपस्थितांनी आपल्या अडी-अडचमी मंत्री क्षीरसागर यांच्यासमोर मांडल्या. तसेच दयनदीन अडचणी, गावाकडच्या समस्या, रस्ते, पाणी शिक्षण दुष्काळ इत्यादी प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. उपस्थितांनी जयदत्त क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या पाठिशी ठाम असल्याची ग्वाही दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.