Bhosari: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीने भोसरी पोलीसांना आर्सेनिक गोळ्यांचे वाटप

Bhosari: International human rights team distributes arsenic pills to Bhosari police दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 10 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनासारख्या महामारीच्या काळात नागरिकांच्या रक्षणासाठी पोलीस कडा पहारा देत आहेत. त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघच्या वतीने भोसरी पोलिसांना आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे मंगळवारी (दि.14) वाटप करण्यात आले.

यावेळी पोलिस निरीक्षक शंकर आवताडे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रविराज रघुनाथ साबळे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे सदस्य विशाल डांगे, वरपे, गणेश पुंडे आदी उपस्थित होते.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 10 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

या परिस्थितीत नागरिकांच्या रक्षणासाठी सैदव खडा पहारा देणाऱ्या पोलिसांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी या उद्देशाने या आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.