Bhosari : काळुराम लांडगे यांना ‘भुमीपूत्र’ पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज- कामगार,क्रीडा, सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल पीएमपीएमएलचे वाहतूक नियंत्रक काळुराम पांडुरंग लांडगे यांना ‘भुमीपूत्र’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भोसरी येथे झालेल्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनामध्ये संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
यावेळी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रा.डॉ.अशोककुमार पगारिया, प्रसिद्ध कवि उद्धव कानडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.