BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari: इंद्रायणीनगर, बालाजीनगरमधून ‘कपबशी’ला मताधिक्य मिळणार – संजय वाबळे

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तसेच मनसे पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ इंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरात आज (सोमवारी) काढण्यात आलेल्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लांडे हे आमदार असताना इंद्रायणीनगर आणि परिसराचा विकास झाला. या भागातील शंभर टक्के मतदान विलास लांडे यांनाच देऊन विजयी करण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक संजय वाबळे यांनी व्यक्त केला.

यावेळी वाबळे म्हणाले, विलास लांडे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. त्यांनी केलेला विकास मतदारसंघातील जनतेच्या डोळ्यासमोर आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील विकास हा केवळ कागदावरच राहिला आहे. आम्ही हे केले, ते केले म्हणून नुसते ढोल वाजविले जात आहेत. पाच वर्षांत मतदारसंघातील नागरिकांची फसवणूक झाली आहे.

आमदार असताना लांडे यांनी इंद्रायणीनगर आणि बालाजीनगर या भागातील नागरिकांवर कधी दादागिरी केली नाही. येथील नागरिकांना सर्व मुलभूत सोयीसुविधा पुरविण्याचे काम त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीत येथील जनता लांडे यांच्या सोबत उभी आहे. इंद्रायणीनगर, बालाजीनगर आणि परिसरातून विलास लांडे यांच्या कपबशी चिन्हाला नागरिकांची पसंती आहे. येथील नागरिकांनी कपबशीलाच विजयी करण्याचे ठरविले आहे, असा विश्वास वाबळे यांनी व्यक्त केला.”

इंद्रायणीनगर, लांडगेनगर, गुरूविहार पांजरपोळ, जयगणेश साम्राज्य, गवळीमाथा वसाहत, गणेशनगर, बालाजीनगर, खंडेवस्ती, स्पाईन रोड, संतनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. डिस्ट्रिक्ट सर्कल येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला. त्यामध्ये नगरसेवक संजय वाबळे, राष्ट्रवादीचे प्रभाग अध्यक्ष सतीश थिटे, बाळासाहेब इचके, दत्तात्रय दिवटे, अशोक थोपटे, विठ्ठल माने, अशोक आहेर, संजय उदावंत, संजय भोसले, माणिक जैद, मेरी डिसुझा, अश्विनी वाबळे, संजय सातव यांच्यासह राष्ट्रवादी, मनसे तसेच भाजप-शिवसेनेचे नाराज कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

HB_POST_END_FTR-A2

.