Bhosari : खड्डेमुक्त भोसरी विधानसभा अभियान! ‘परिवर्तन हेल्पलाईन’च्या 9379909090 व्हॉट्स अ‍ॅपवर टाका खड्याचा फोटो

चोवीस तासात होणार समस्येचे निराकरण; आमदार महेश लांडगे यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतरासंघाच्या परिपूर्ण विकासासाठी आमदार महेश लांडगे यांनी खड्डेमुक्त भोसरी विधानसभा हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. भोसरीत कोठेही, कधीही, केव्हाही, रस्त्यावर किंवा आजूबाजूस खड्डा आढळल्यास परिवर्तन हेल्पलाईनच्या 9379909090 व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो टाकण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. फोटो टाकल्यानंतर 24 ते 48 तासात समस्येचे निराकरण केले जाईल.

शहरातील काही भागात रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर मोठे खड्डे पडतात. यंदा अजून पाऊस सुरूच असल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होतात. वाहनचालकांना कसरत करुन वाहन चालवावे लागते.

_MPC_DIR_MPU_II

आमदार महेश लांडगे यांनी भोसरी मतदारसंघ खड्डे मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी भोसरीच्या परिपूर्ण विकासासाठी मतदारसंघात खड्डेमुक्त अभियान हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.

भोसरीत कोठेही, कधीही, केव्हाही, रस्त्यावर किंवा आजूबाजूस खड्डा आढळल्यास त्या खड्याचा फोटो परिवर्तन हेल्पलाईनच्या 9379909090 या व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. फोटो टाकल्यानंतर 24 ते 48 तासात समस्येचे निराकरण केले जाईल.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ”खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होता. वाहने चालवितांना वाहनचालांकाना कसरत करावी लागते. त्यामुळे पाठीचे, मणक्याच्या आजारामध्ये वाढ होत आहे. भोसरी मतदारसंघ खड्डेमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. नागरिकांनी परिवर्तन हेल्पलाईनच्या 9379909090 या व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो टाकावेत. तात्काळ त्या समस्येचे निराकरण करण्यात येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1