Bhosari : हॉस्पिटलसमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – हॉस्पिटलसमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून 40 हजारांचा लॅपटॉप चोरून नेला. हा प्रकार 23 डिसेंबर रोजी दुपारी तीन ते साडेचारच्या सुमारास मोरया हॉस्पिटल दापोडी येथे घडला.

माधव रामदास रसाळ (वय 31, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रसाळ यांनी त्याची कार (एम एच 14 / जी एस 0778) पिंपळे गुरव रोड दापोडी येथे असलेल्या मोरया हॉस्पिटलसमोर पार्क केली. भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी कारची मागील काच फोडून कारमधून 40 हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप चोरून नेला. याबाबत सोमवारी (दि. 6 जानेवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.