BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : दिघी-भोसरी शिवेवरच्या रस्त्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

तब्बल 25 वर्षानंतर दिघी-भोसरी शिवेवरचा रस्ता एका रात्रीत पूर्ण

एमपीसी न्यूज – भोसरी आणि दिघीला जोडणारा शिवेवरील रस्ता तब्बल 25 वर्षांनी मार्गी लागला आहे. मंगळवारी एका रात्रीत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. दिघी, भोसरीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे दिघी-भोसरीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रस्त्याबाबत आजपर्यंत अनेकांनी गाजरे दाखविले. काम फक्त महेशदादांनी केले. शिवेवरचा रस्ता एका रात्रीत पूर्ण करुन डांबरीकरण केले. अशी कामे फक्त महेशदादांच करु शकतात. ‘आधी केले मग सांगितले’ असे आमदारांचे काम आहे. ‘महेशदादा है, तो मुमकीन है’ अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.

भोसरी-दिघे शिवेवरचा सावंतनगर कमान ते पंचशील बुद्धविहार हा रस्ता मागील 25 वर्षांपासून रखडला होता. परिणामी, दिघीतील नागरिकांना मॅगझीन कॉर्नर ते भोसरी असा पाच किलोमीटरचा वळसा घालून भोसरीला जावे लागत होते. विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. हा रस्ता मार्गी लावण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. जागा मालक गवळी कुटुंबियांसोबत बैठक घेतली. महापालिका अधिका-यांशी बैठक घेऊन गवळी कुटुंबियाला जागेच्या मोबदला देण्याचे आदेश दिले. महापालिकेने जागेचा एफएसआय आणि टीडीआरच्या स्वरुपात मोबदला दिला. त्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला.

  • दिघीचे भाजप नगरसेवक विकास डोळस म्हणाले, “दिघी भोसरीचा शिव रस्ता, सावंतनगर कमान ते पंचशील बुद्धविहार हा रस्ता मागील 25 वर्षांपासून रखडला होता. दिघीकर आणि भोसरीकर यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय होता. रस्ता नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. मॅगझीन कॉर्नर ते भोसरी असा पाच किलोमीटरचा वळसा घालून भोसरीला जावे लागत होते. रस्त्याबाबत अनेकांनी आश्वासने दिली. परंतु, प्रश्न काही मार्गी लागला नव्हता. आज आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून एका रात्रीत रस्त्याचे डांबीरकरण केले आहे. रात्री अकरा वाजता काम सुरु झाले. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत रस्ता पूर्ण झाला. हा दिघीकरांसाठी आनंदाचा क्षण आहे”

“या रस्त्यासाठी अनेकांनी गाजर दाखविले. काम फक्त महेशदादांनी केले. जागा मालक गवळी कुटुबियांचे देखील मी आभार मानतो. त्यांच्यामुळे दिघीकरांना रस्ता मिळाला असून मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे नागरिकांचे अंतर वाचणार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे. दिघीतील 10 ते 15 हजार नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रस्ता झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे” असेही डोळस म्हणाले.

  • नगरसेवक लक्ष्मण उंडे म्हणाले, “भोसरी-दिघे सीवेवरचा रस्ता आमदार लांडगे यांच्यामुळेच मार्गी लागला आहे. महापालिका निवडणुकीला सामोरे जात असताना या रस्त्याचा प्रश्न समोर आला होता. आमदार महेश लांडगे यांनी रस्त्याच्या कामाचा नारळ फोडला. यापूर्वी देखील अनेकांनी नारळ फोडला होता. परंतु, चारही नगरसेवक निवडून आल्यानंतर सीमेवरचा हा रस्ता मार्गी लावण्यास प्राधान्य दिले. आमदार महेश लांडगे यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत एका रात्रीत हा रस्ता मार्गी लावला. डांबरीकरण केले. अशी लोकहिताचे काम फक्त महेशदादाच करु शकतात. दिघीसह विश्रांतवाडी, धानोरीला या मार्गे नागरिक जात होते. त्यांना विलंब होत होता. आता नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे”

संदीप गवळी म्हणाले, ”मागील 25 वर्षांपासून हा रस्ता प्रलंबित होता. ही संपूर्ण जागा गवळी कुटुबियांची होती. या रस्त्याच्या मोबदल्यात एफएसआय मिळावा यासाठी आम्ही दहा वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. पण, अधिकारी दाद देत नव्हते. आमदार महेश लांडगे यांच्यासमोर हा प्रश्न मांडला. लांडगे यांनी अधिका-यांची बैठक घेऊन गवळी कुटुंबाला जागेचा एफएसआय आणि टीडीआरच्या स्वरुपात मोबदला दिला”.

  • ”या रस्त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडविले जातील. अनेक अपघात झाले. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमदारांनी केलेले काम पाहून दिघी आणि भोसरीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या रस्त्यासाठी नगरसेवक लक्ष्मण उंडे, विकास डोळस यांनी पाठपुरावा केला होता. भोसरीतील जनतेने सहकार्य केले. त्यांचे मी आभार मानतो”.

नागरिक उत्तम घुले म्हणाले, ”या रस्त्याची नागरिकांना आवश्यकता होती. हा प्रश्न सोडविण्यात अनेक लोकप्रतिनीधी असफल ठरले होते. अनेकांनी या रस्त्याच्या मुद्यावर निवडणूक लढविल्या आणि जिंकल्या देखील; मात्र नागरिकांच्या हातात केवळ आश्वासनाचे गाजर राहायचे. दिघीकर विकास प्रतिष्ठान आणि नागरिकांनी आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्तांकडे याबाबत पाठपुरावा केला”.

  • ”आज ख-या अर्थाने भोसरी-दिघीच्या शिवेवरचा रस्ता मार्गी लागला आहे. हा रस्ता होणे अतिशय गरजेचे होते. या रस्त्याने दिघी आणि भोसरी जोडली आहे. आम्ही दिलेल्या लढ्याला आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नाने यश मिळाले आहे. ही आनंदाची बाब आहे. आजपर्यंत भरपूर आमदार, नगरसेवक, पदाधिकारी झाले. पण त्यामध्ये फक्त महेशदादाच दमदार आमदार निघाले. महेशदादा है तो मुमकीन है”, असेही ते म्हणाले.

माजी सैनिक सेवासंघाचे दनवे म्हणाले,”महादेवनगर, सावंतनगर, आदर्शनगर, दिघी या परिसरातील सर्व नागरिक, वयोवृद्धांना रस्त्याच्या अडचणीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याचा मागील काही वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करत होतो. आमदार महेश लांडगे यांनी मनावर घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे. आधी केले मग सांगितले असे आमदार लांडगे यांचे काम आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून हा रस्ता झाल्याने महेश लांडगे यांचे आम्ही ऋणी आहोत”.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3