Bhosari : लायन्स क्लब भोजापुर गोल्डतर्फे डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांचा सन्मान

एमपीसी न्यूज- लायन्स क्लब भोजापुर गोल्डच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त प्रशीद्ध बाल शल्यचिकित्सक डॉ आदर्श हेगडे व नामवंत दंतआरोग्य तज्ञ डॉ प्रशांत गादिया यांच्यासहित १५ डॉक्टरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी उपप्रांतपाल एमजेएफ हेमंत नाईक, लायन्स क्लबचे अध्यक्ष मुकुंद आवटे, सुप्रसिद्ध वेदांताचार्य हभप सुभाष महाराज गेठे, प्रा शैलजा सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते. हेगडे यांच्या मानपत्राचे वाचन साफल्य हॉस्पिटलचे डॉ. रोहिदास आल्हाट यांनी तर डॉ. गादिया यांच्या मानपत्राचे वाचन अष्टविनायक ग्रुपचे श्रीकृष्ण अत्तरकर यांनी केले. मानपत्र स्मृतीचिन्ह शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पुरस्कार्थी डॉक्टरांनी आपल्या वैद्यकीय सेवेबरोबरच समाजासाठी करत असलेल्या कामाबाबत माहिती दिली, डॉ रोहिदास आल्हाट यांनी डॉक्टरांवर होत असलेल्या हल्याबाबत तीव्र निषेध व्यक्त करीत या घटनांची चिंता व्यक्त केली. प्रा शैलजा सांगळे, हेमंत नाईक, सुभाष महाराज गेठे यांनी विचार व्यक्त केले.

समाजात संवेदनशील, समाजामुख व्रतस्थ सेवाभावाने काम करणाऱ्या डॉक्टर्सचा मागील आठ वर्षांपासून लायन्स क्लब भोजापुर गोल्डतर्फे सन्मान करण्यात येतो. मुकुंद आवटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मुरलीधर साठे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.