-MPC-TOP-MOST-BANNER-I

Bhosari : सद्यस्थितीतील शैक्षणिक धोरणात सुधारणा आवश्यक- प्राचार्य रावसाहेब नागरगोजे

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- आजच्या परिस्थितीत शिक्षक शासनाच्या पुरस्काराची अपेक्षा ठेवत नाही. परंतु शिक्षकांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन हृदयातुन शाबासकीची थाप देणारी लायन्स क्लब सारखी संस्था अतिशय महत्वाचे सेवाभावी कार्य करीत आहे अशी भावना भैरवनाथ माध्यमिक व उच्च कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब नागरगोजे यांनी व्यक्त केली.

लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड आणि वात्सल्य मदर अॅड चाईल्ड केअर हॉस्पिटल भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना नागरगोजे बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द कवी भरत दौंडकर, पत्रकार अनिल कातळे, पिं. चिं शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, नगरसेविका प्रियांका बारसे, लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड क्लबचे अध्यक्ष सुदाम भोरे, डॉ रोहिदास आल्हाट, पुरुषोत्तम सदाफुले, सचिव श्रीकृष्ण अत्तरकर, ह.भ.प विठ्ठल महाराज गव्हाणे, खजिनदार मुरलीधर साठे उपस्थित होते.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची इजा होईल अशी शिक्षा करायची नाही. छडी द्यायची नाही. मात्र हीच छडी विद्यार्थी शिक्षकांना देतील की काय अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे असे सांगत सद्यस्थितीतील काही शैक्षणिक धोरणे ही न पटणारी असल्याचे नागरगोजे सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आलेले शिक्षक रामदास थोरात यांच्यासह डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाचे विभाग प्रमुख डॉ. हेमंत देशपांडे, तोलानीइन्स्टिट्यूट्सच्या वंदना शिंदे, निवृत्त प्राचार्य अविनाश अरण्य यांच्यासह पिंपरी चिंचवड परिसरातील ३० मुख्याध्यापक व शिक्षकांना लायन्स क्लब भोजापूर गोल्डच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

यावेळी कवी भरत दौंडकर यांनी विविध कवितांमधून सामाजिक परिस्थितीवर भाष्य करीत अंतर्मुख केले. गुणवत्ता यादीमध्ये आलेला विद्यार्थी जेव्हा डॉक्टर, इंजिनिअर, वकील न होता शिक्षक होण्यासाठी प्रयत्न करील तेव्हाच खऱ्या अर्थाने शिक्षकांना प्रतिष्ठा प्राप्त होईल असेही दौंडकर यांनी सांगितले.

प्रास्ताविक लायन्स क्लबचे अध्यक्ष सुदाम भोरे यांनी तर स्वागत डॉ रोहिदास आल्हाट यांनी केले. सूत्रसंचालन प्रा .दिगंबर ढोकले यांनी तर आभार मुरलीधर साठे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन मुकुंद आवटे, नंदा फुगे, अरुण इंगळे, प्रा . शंकर देवरे, नागेश वसतकर, डॉ .संदीप कवडे यांनी केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.