Bhosari : टपरी फोडून दीड हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – दोन चोरट्यांनी मिळून टपरी फोडून दीड हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 21) सकाळी नऊच्या सुमारास आळंदी रोडवरील गवळी उद्यानाजवळ उघडकीस आली.

योगेश अशोक मोहिते (वय 32, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, यश ऊर्फ दाद्या विनोद भाकरे (वय 19, रा. दिघी रोड, भोसरी) आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश यांची आळंदी रोडवर गवळी उद्यानाजवळ टपरी आहे. शुक्रवारी रात्री योगेश यांनी अकराच्या सुमारास टपरी बंद केली. त्यानंतर, दोन चोरट्यांनी मिळून टपरीचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. टपरीमधून सुमारे 1 हजार 495 रुपये किमतीचा माल चोरून नेला.

भोसरी पोलिसांनी ‘यश’ला अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलाला समजपत्र देऊन सोडून देण्यात आले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.