Bhosari Crime News : ‘या’ कंपनीतील 3 लाख 19 हजार रुपयांचे मटेरियल चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या गेटवरुन आत घुसून कंपनीतील 3 लाख 19 हजार 984 रुपयांचे मटेरियल चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भोसरी एम आय डी सी येथील ‘महाजन एंजरप्राईज’ कंपनीत 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान हा प्रकार घडला.

मिलिंद नारायण महाजन (वय 58, पाषाण, पुणे) यांनी भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी कंपनीच्या गेटवरुन आत घुसून कंपनीतील 3 लाख 19 हजार 984 रुपयांचे मटेरियल चोरीला नेले आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.