Bhosari: ‘महायुती’चे महेश लांडगे यांच्यासह 20 जणांचे अर्ज दाखल; सोमवारी माघार घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर होणार चित्र स्पष्ट

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे पुरस्कृत अपक्ष विलास लांडे यांच्यासह 20 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची उद्या (शनिवारी) छाननी होणार आहे. सोमवारी माघार घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अर्ज दाखल करण्याचा आजचा शुक्रवार (दि.4) शेवटचा दिवस होता. शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावाधाव सुरु होती. भोसरी मतदारसंघात अधिकृत पक्षाचा उमेदवार एकच आहे. महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांचा एकट्याचाच पक्षाकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासमोर अपक्ष अर्ज दाखल केलेले माजी आमदार विलास लांडे यांचे आव्हान असणार आहे.

महायुतीकडून महेश लांडगे यांनी तीन अर्ज भरले आहेत. त्यांच्या पत्नी पूजा महेश लांडगे यांनी देखील भाजपकडून अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे पुरुस्कृत अपक्ष विलास लांडे यांनी दोन अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अपक्ष म्हणून दत्तात्रय बाबूराव साने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दत्तात्रय कोंडीबा जगताप, समाजवादी पार्टीच्या वहिदा शहेनु शेख, बीआरएसपीचे ज्ञानेश्वर सुरेश बो-हाटे, जनहित लोकशाही पार्टीचे विश्वास भगवान गजरमल, वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज जब्बार शेख, बहुजन मुक्ती पार्टीचे विजय लक्ष्मण आराख, महाराष्ट्र मजदूर पक्षाचे भाऊ रामचंद्र अडागळे, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र आत्माराम पवार, हमारी अपनी पार्टी राजवीर दशरथ पवार यांनी पक्षांकडून अर्ज भरले आहेत.

‘यांनी’ दाखल केले अपक्ष अर्ज
महेश दिलीप तांदळे, डॉ. मिलिंदराजे दिंगबर भोसले, हरेश बाजीराव डोळस, छाया संजय जगदाळे, मारुती गुंडाप्पा पवार, जालिंदर किसन शिंदे, विष्णू एकनाथ शेळके यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.