Bhosari: निकालापूर्वीच झळकले महेश लांडगे यांचे ‘पर्मनंट आमदार’चे फलक !

कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास की अतिआत्मविश्वास ?

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (गुरुवारी) होणार आहे; मात्र, भोसरीचे भाजप उमेदवार महेश लांडगे यांचे आजच आमदार झाल्याचे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक झळकले आहेत. कार्यकर्त्यांचा हा विजयाचा विश्वास आहे की अतिआत्मविश्वास हे उद्या समजून येईल पण तोपर्यंत या फलकाबाबत भोसरीत चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, मतदान पार पडल्यानंतर अनेक उमेदवारांनी विजयी मिरवणूक काढली. तर, काहींनी विजयाचे फलक देखील झळकावले आहेत.

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (गुरुवारी) होणार आहे. भोसरीतून भाजपचे महेश लांडगे आणि अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्यात लढत झाली आहे. उद्या होणा-या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना महेश लांडगे यांचे आमदार झाल्याचे फलक आजच झळकले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अति आत्मविश्वासाची चर्चा सुरु झाली आहे.

चिखली, च-होली, मोशी परिसरात आमदार महेश लांडगे यांना शुभेच्छा देणारा फलक झळकला आहे. ‘महेशदादा लांडगे यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन’, ‘पर्मनंट आमदार’ असा मजकूर या फलकावर आहे. कार्यकर्त्यांचा हा विजयाचा विश्वास आहे की अतिआत्मविश्वास हे उद्या स्पष्ट होणार आहे. मात्र तो पर्यंत या फलकामुळे सर्वांचीच करमणूक होत आहे.

दरम्यान, सोमवारी मतदान झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी विजयाची मिरवणूक काढून आपला अतिआत्मविश्वास दाखवून दिला. खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांचे देखील आमदार झाल्याचे फलक आतापासूनच झळकले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.