Bhosari : भोसरी महोत्सवात यंदा लावणीचा तडका, हास्याची कारंजी

रविवारपासून प्रारंभ : लांडगे नाट्यगृहात चार दिवस भरगच्च कार्यक्रम

एमपीसी न्यूज – गणपती उत्सवानिमित्त भोसरी कला क्रीडा मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी (दि. 16) भोसरी महोत्सव 2018 चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारपर्यंत (दि. 19) सुरू राहणार्‍या या महोत्सवात नाटक, कवी संमेलन, आंतरशालेय नृत्य स्पर्धा, मिस पिंपरी-चिंवचड स्पर्धा, लावणी असे भरगच्च कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंचचे अध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. नितीन लांडगे व विजय फुगे यांनी दिली.

चार दिवस चालणारा हा सांस्कृतिक कला महोत्सव भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात रंगणार आहे. भोसरी शहराची कला व क्रीडा क्षेत्रात नव्याने ओळख निर्माण व्हावी, पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने भोसरी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. भोसरीतील कलाप्रेमींनी शहरवासीयांच्या मनोरंजनासाठी सुरू केलेल्या या महोत्सवाचा आस्वाद सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. लांडगे यांनी केले आहे.

महोत्सवाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी 6.00 वाजता खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार महेश लांडगे असून प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेता दिगंबर नाईक व सुचित जाधव, तसेच महापौर राहुल जाधव, माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, भाजप चित्रपट कामगार आघाडी राज्य उपाध्यक्षा प्रीती व्हिक्टर, ई प्रभाग अध्यक्षा भीमाताई फुगे, शिक्षण सभापती सोनाली गव्हाणे, नगरसेवक संतोष लोंढे, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल अध्यक्ष इंद्रमन सिंह, नगरसेवक अजित गव्हाणे, रवी लांडगे, राजेंद्र लांडगे, विलास मडेगिरी, संजय वाबळे, विक्रांत लांडे, नगरसेविका सारिका लांडगे, नम्रता लोंढे, प्रियांका बारसे, अनुराधा गोफणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी 6 वाजता दिगंबर नाईक अभिनित नवरी छळे नवर्‍याला हे नाटक होणार आहे. सोमवार, दि. 17 रोजी सायंकाळी पाच वाजता हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नंदूशेठ दाभाडे व शैलेश मोरे उपस्थित रहाणार आहेत.

मंगळवार, दि. 18 रोजी सकाळी 10 वाजता आंतरशालेय नृत्य स्पर्धा होणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका शुभांगी लोंढे व सुनंदा फुगे तसेच सुनिता थोपटे उपस्थित रहाणार आहेत. सायंकाळी 5 वाजता मिस पिंपरी-चिंचवड स्पर्धा घेण्यात येणार आहे. यावेळी शिक्षण सभापती सोनाली गव्हाणे व नगरसेविका प्रियांका बारसे उपस्थित रहाणार आहेत.

बुधवार, दि. 19 रोजी महोत्सवाची सांगता होणार असून यावेळी विजेत्या स्पर्धकांना माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती काकासाहेब लांडे, नगरसेवक संतोष लोंढे व अंकुश पठारे, पवना सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, क्रेडाई पुणे मेट्रो उपाध्यक्ष अनिल फरांदे, अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे, पवना बँकेचे संचालक शामराव फुगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, तसेच अ‍ॅड, बाळासाहेब थोपटे, सुनील हुलावळे, सुनील गव्हाणे, महादेव गव्हाणे, जितेंद्र लांडगे, सुनील लांडगे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

सायंकाळी 6 वाजता माझ्या लावणीचे लावण्य हा मराठमोळ्या लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. भोसरी महोत्सवातील वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी केले आहे.हा मोहत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मंचाचे सर्व सदस्य प्रयत्ऩशील असल्याचेही लांडगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.